स्लिम असल्यामुळे ‘ही’ अभिनेत्री दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत झाली रिजेक्ट

सध्या सिनेइंडस्ट्रीत स्लिम, फीट व ग्लॅमरस कलाकारांची चलती पहायला मिळते. मात्र बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीला स्लिम असल्यामुळे दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

ही अभिनेत्री म्हणजे अर्चना पुरन सिंग. अर्चनाने १९८२ साली प्रदर्शित झालेल्या निकाह चित्रपटातून करियरला सुरूवात केली होती. मात्र अर्चनाने जेव्हा दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम करायचं ठरवलं तेव्हा तिला तिथं काम मिळालं नाही. याबद्दल खुद्द तिनेच कपिल शर्मा शोमध्ये सांगितलं.

द कपिल शर्मा शोत शक्ती कपूर गेस्ट म्हणून आले होते. त्यावेळी शक्ती कपूर यांनी सांगितलं की, अर्चना पूरन सिंग माझी खूप चांगली मैत्रिण आहे. मात्र जेव्हा पासून मी हिला पाहतोय तेव्हापासून ती तशीच आहे. हे ऐकताच कपिल शर्मा म्हणाला की, हो, अर्चना जी स्क्रीनवर चांगली दिसते. तेव्हा शक्ती कपूर बोलले की तिच्यासोबत हात मिळवलं तर वाटेल की कोणत्या तरी पठानचा हात पकडला आहे. त्यावर शक्ती कपूर म्हणाला की, तिला हैदराबादला घेऊन गेलो तर चांगला रोल मिळेल.

त्यावर अर्चनाने हसत सांगितलं की, जेव्हा मी साऊथ चित्रपटात काम मिळवण्यासाठी ट्राय केलं होतं तेव्हा मी खूप बारीक आहे असे सांगून मला नकार दिला. इथे तर असं चालणार नाही.