‘या’ चित्रपटातून पुन्हा एकदा आर्ची-परश्या एकत्र येणार

सर्वात लोकप्रिय जोडी ‘आर्ची-परश्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. खूप दिवसांपूर्वी रिंकू आणि आकाश ‘सैराट 2’मधून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणारी अशी बातमी समोर आली होती. आता त्याचा खुलासा झाला आहे ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आणि ते ही नागराज मंजुळेच्याच सिनेमातून. पण तो सिनेमा ‘सैराट’ नसून ‘झुंड’ असा आहे.

नागराज बिग बींसोबत नागपूरमध्ये ‘झुंड’चं शुटिंग करत होता. यावेळी रिंकू आणि आकाश ही जोडी देखील तेथे उपस्थित होती. संपूर्ण सिनेसृष्टीला ‘सैराट’ने दखल घ्यायला भाग पाडली. फक्त मराठीतच नव्हे तर परदेशातही या सिनेमाचं भरभरून कौतुक झालं. या सिनेमातील आर्ची -परश्या या जोडीने तमाम जनतेला वेड लावलं. आणि आता हीच जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे त्यांचे चाहते अतिशय खुश आहेत. तसेच आर्ची परश्याला देखील एवढ्या मोठ्या महानायकासोबत स्क्रिन शेअर करता येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like