अरबाझ खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया ऍन्द्रीयानी झळकणार बॉलिवूडमध्ये

रबाझ खानची गर्लफ्रेंड आणि इटलीची मॉडेल जॉर्जिया ऍन्द्रीयानी हिनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची आपली तयारी केली आहे. “श्रीदेवी बंगलो’मधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. डोळा मारण्याच्या व्हिडीओमुळे देशभरात एकदम प्रकाशझोतात आलेली प्रिया प्रकाश वारियर ही या सिनेमातील मुख्य हिरोईन असणार आहे. याशिवाय अरबाझ खानदेखील पाहुण्या कलाकाराच्या रोलमध्ये दिसणार आहे. स्वतः जॉर्जियाने प्रसार माध्यमांना आपल्या या रोलबाबत कळवले आहे.

लवकरच ती शुटिंगलाही सुरुवात करणार आहे. श्रीदेवीच्या मृत्यूशी साधर्म्य असलेल्या कथाभागामुळे “श्रीदेवी बंगलो’ हा सिनेमा पूर्वीच प्रकाशझोतात आला आहे. बाथटबमध्ये बुडून मृत्यू होणाऱ्या श्रीदेवीची आठवण होणारा ट्रेलर यापूर्वी रिलीज झाला आहे.

श्रीदेवी नावाच्या एका फेमस ऍक्‍ट्रेसला आपल्या आयुष्यात एकाकी आयुष्य जगायची वेळ येते, असे या सिनेमाचे साधारण कथानक आहे. पण हा अभिनेत्री श्रीदेवीचा बायोपिक नक्कीच नाही. जॉर्जिया सलमान खानबरोबर “दबंग 3’मध्ये डान्स आयटम करणार असल्याचीही चर्चा होती. पण ते खरे नसल्याचे जॉर्जियाने स्पष्ट केले आहे. “केरोलिन कामाक्षी’ या तमिळ वेब सिरीजमध्येही ती दिसणार आहे.

 

 

You might also like