रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर – अरबाज खान

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून नवीन वाद सुरू झाला आहे. करण जोहर, सलमान खान, आलिया भट्ट, सोनम कपूर यांच्यावर जोरदार टीका होत आहे. सुशांतचे चाहते आणि सलमानचे चाहते यांच्यामध्ये सोशल मीडियावर द्वंंद्व सुरू आहे. अशातच अरबाज खान याने ट्विट करत एकंदर परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे.
‘रिकामं डोकं हे सैतानाचं घर असतं अशी म्हण आम्हाला शाळेत शिकवली गेली होती. या म्हणीचा खोल अर्थ जाणून घेण्यासाठी मी तेव्हा खूप लहान होतो. पण आता आजूबाजूला जे काही घडतंय ते पाहून मला याच म्हणीची प्रचिती येतेय.’ असे रविवारी केलेल्या या ट्विटमध्ये अरबाजने म्हटले आहे.