मलायकासोबतच्या घटस्फोटावर अरबाज खानने सांगितले घटस्फोटाचे कारण

मलायका अरोरा व अरबाज खान बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल होते. त्यांनी लग्नाच्या १९ वर्षांनंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अरबाज व मलायका त्यांच्या जीवनात पुढे वळले आहेत आणि वेगवेगळ्या लोकांना डेट करत आहेत.

नुकतेच अरबाज खानने मलायका अरोराबाबत वक्तव्य केले आहे. म्हणाला की, आम्ही घटस्फोटानंतरही एकमेकांचा आदर करतो. डेक्कन क्रॉनिकलला वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खानने आपली एक्स वाईफ मलायकासोबतच्या नात्याबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, आम्ही बरेच वर्ष एकत्र राहिलो आणि आमच्या खूप साऱ्या आठवणी आहे. आमची मुलं ही सर्वात खास बाब आहे. त्यामुळे एकमेकांप्रती आमच्यात आदर आहे. असं काही होतं आमच्यात ज्यामुळे आम्ही विभक्त झालो. याचा अर्थ हा नाही की आम्ही एकमेकांचा द्वेष करतो. आम्ही मॅच्युएर आहोत. आम्ही आदराने सर्व गोष्टी करत आहोत.

 

 

You might also like