अनुष्काच्या बेबीबंप फोटोवर विराटची प्रतिक्रिया

अनुष्का शर्मा गरोदर असून २०२१ मध्ये कोहली कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. क्रिकेटर विराट कोहलीने फेसबुकवर फोटो पोस्ट करत ही गुड न्यूज आपल्या चाहत्यांना काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर आता अनुष्का शर्मा हिने देखील इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोवर विराटने दिलेली प्रतिक्रिया सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“जीवन निर्माण करण्याच्या अनुभवापेक्षा वास्तविक आणि नम्र काहीही नाही.” अशा आशयाचं कॅप्शन लिहून अनुष्काने बेबीबंपसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. “माझं संपूर्ण जग मला एकाच फ्रेममध्ये दिसतंय.” अशा आशयाची प्रतिक्रिया विराटने या फोटोवर दिली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली.  विराट-अनुष्काने आनंदाची बातमी सोशल मीडियावर पोस्ट करताच चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

You might also like