विरूष्काच्या घरी लवकरच होणार चिमुकल्याचे आगमन

विराट कोहली यांच्या नात्यात आता एक अत्यंत महत्त्वाचं वळण आलं आहे. हे वळण त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं मोठी जबाबदारी घेऊन आल्याचं दिसत आहे. यामागचं कारणंही तसंच आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या कुटुंबात लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. विराट कोहलीने फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.

विराटने फोटो शेअर ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, अशी कॅप्शन दिली आहे. अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्का आणि विराट या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो पोस़्ट करत गोड बातमी दिली आहे. ही बातमी आहे या दोघांच्या नात्यात येणाऱ्या तिसऱ्या व्यक्तीची. म्हणजेच एका नव्या पाहुण्याची. विरुष्कानं शेअर केलेली पोस्ट पाहता बी- टाऊनच्या या अभिनेत्रीला मातृत्त्वाची चाहूल लागल्याचं स्पष्ट होत आहे.

विराट आणि अनुष्का इटलीमध्ये ११ डिसेंबर २०१७ साली विवाहबंधनात अडकले होते. यानंतर सोशल मीडियावर विराट-अनुष्काच्या विवाहाचे फोटो अनेक दिवस व्हायरल झाले होते.

 

You might also like