अनुराग कश्यपचं पायल घोषला प्रत्युत्तर

कायम चर्चेत असणारा चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप सध्या पायल घोषमुळे चर्चेत आला आहे. पायल घोषने अनुराग कश्यपवर गैरवर्तणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता अनुराग कश्यपने ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ‘थोडी तरी मर्यादा बाळगा’, असं म्हणत अनुराग कश्यपने उत्तर दिलं आहे.

“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. चला काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने ट्विट करत अनुराग कश्यपवर काही आरोप केले होते. सोबतच तिने एका तेलुगू वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओदेखील शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अनुराग कश्यपने पायल घोषसोबत गैरवर्तन केल्याचं म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या:-

You might also like