अनुपम खेर यांच्या आईला त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं माहित नाही; ‘हे’ आहे कारण

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ६,४९७ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २ लाख ६० हजार झाली आहे. करोनाने आणखी १९३ जणांचा बळी घेतल्याने राज्यात मृतांची एकूण संख्या १०,४८२ वर पोहोचली आहे.गेल्या २४ तासांत १८ हजार ८५० रुग्ण करोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे.

……म्हणून रेखा यांनी कोरोना चाचणीसाठी दिला नकार

लाखो लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या यादीत अनेक सेलिब्रिटी देखील आहेत. दरम्यान अनुपम खेर यांच्या आईसह कुटुंबातील तीन जणांना करोनाची लागण झाली आहे. परिणामी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या प्रकरणातील एक लक्षवेधी बाब सोमर अली आहे ती म्हणजे अनुपम खेर यांच्या आईला त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं माहित नाही.अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती दिली.

‘असल तो सिद्दी तर आम्हीबी हाय जिद्दी’; पाहा, अंगावर काटा आणणारा ‘जंगजौहर’चा टीझर

ते म्हणाले, “माझा भाऊ, वहिनी आणि पुतणी यांना देखील करोनाची लागण झाली. त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरु आहेत. परिणामी ते झपाट्याने बरे होत आहेत. परंतु या वातावरणात मला आईची फार चिंता होतेय. कारण रुग्णालयात उपचार घेताना देखील ती शांत राहात नाही. ती सतत आमची चिंता करत असते. त्यामुळे आम्ही आईला तिला करोना झाल्याचं सांगितलेलं नाही. पण आसपासचं वातावरण पाहून कचादित तिला कळतंय की ती इथे का आली आहे.”त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

You might also like