‘दया बेन’ नंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतून आणखी एका कलाकाराची एक्झिट

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी आहे. ‘दया बेन’च्या एक्झिटनंतर आता आणखी एक जण मालिका सोडण्याच्या तयारीत आहे. मालिकेत ‘सोनू’ची भूमिका साकारणाऱ्या निधि भानुशालीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

निधि सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करत असून शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती मालिकामधून बाहेर पडत असल्याचं सांगण्यात येत आहे. निधि मुंबईतील मीठीबाई कॉलेजमध्ये शिकत आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी निधिच्या या निर्णयावर कोणतीही समस्या नसून निधिने आधी तिचं शिक्षण पूर्ण करावं असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

 

 

 

You might also like