अनूप जलोटा यांच्या आईचे निधन

प्रसिद्ध भजन सम्राट अनूप जलोटा यांच्या आईचे निधन झाले आहे. काल सकाळी त्यांच्या आईने अखेरचा श्वास घेतला. गेले काही दिवस परिस्थिती स्थिर नव्हती.
मुंबईमधील एका रूग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आईचे नाव कमला जलोटा असे होते. जलोटा यांच्या आईच्या मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेली नाही.