एक महिन्यानंतर सुशांतच्या मृत्यूवर अंकिताने दिली प्रतिक्रिया

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो ३४ वर्षांचा होता. त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नसून यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. १४ जुलै  सकाळी बराचवेळ सुशांतने घरचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दरवाजा तोडला. यावेळी सुशांतचा देह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. आज सुशांतला जाऊन पूर्ण १ महिना झाला आहे.

दरम्यान तब्बल एक महिन्यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने त्याच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करुन तिने आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.या फोटोमध्ये देवाऱ्यात दिवा लावलेला दिसत आहे. या फोटोवर तिने “देवाचा मुलगा” असं कॅप्शन लिहून सुशांतला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्याने एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत होती. जवळपास पाच वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. २०१३ मध्ये सुशांतने ‘काइ पो चे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्या दोघांचं ब्रेकअप झालं.

View this post on Instagram

CHILD Of GOD 😇

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

You might also like