अंकिता-मिलिंदचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल

मिलिंद सोमण आणि अंकिता कोनवार यांची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा असते. यंदा मात्र हे दोघे त्यांच्या डान्समुळे चर्चेत आले आहे .पाऊस हा रोमॅण्टीक वातावरण निर्माण करणारा ऋतू असल्याचं अनेक वेळा म्हटलं जातं. त्यामुळे पाऊस पडायला लागल्यावर अंकिता आणि मिलिंददेखील रोमॅण्टीक झाले असून त्यांनी एका गाण्यावर डान्स केल्याचं पाहायला मिळालं.
अंकिताने हा व्हिडीओतिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अंकिता आणि मिलिंद सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून ते त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “पावसाचे थेंब, गाणं आणि तू, यापेक्षा छान काहीच असू शकत नाही”, असं कॅप्शन अंकिताने या व्हिडीओला दिलं आहे.