अखेर लग्‍नाच्या विषयावर अंकिता लोखंडेने सोडले मौन!

अंकिता लोखंडे आपल्‍या पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चेत राहिली आहे. गेल्‍या काही दिवसांमध्‍ये अंकिता लवकरच आपल्‍या बॉयफ्रेंडसोबत विवाहबंधनात अडकणार असल्‍याची चर्चा सुरू आहे. आता या चर्चेत जरा नवीन ट्‍विस्‍ट आला आहे. आणि हा ट्‍विस्‍ट स्‍वत: अंकिताने आणला आहे.  सध्‍या लग्‍न करण्‍याचा कुठलाही विचार केलेला नाही, असे अंकिताने म्‍हटले आहे.  

एका इंग्‍लिश वृत्तपत्राला दिलेल्‍या माहितीनुसार, अंकिता लोखंडेने म्‍हटले आहे, ‘जर मी लग्‍न केले असते तर आपणास नक्‍कीच सांगितले असते. फक्‍त सांगणार नाही तर लग्‍नालाही नक्‍की बोलवेन. आता या विषयावर काही बोलणार नाही. कारण, आता माझा लग्‍न करण्‍याचा कोणताही प्लॅन नाही. मी आता केवळ माझ्‍या कामाकडे लक्ष देत आहे.’

अंकिता लोखंडे-विकी जैन एकमेकांना डेट करत असल्‍याचे वृत्त समोर आले. परंतु, अंकिता लोखंडे किंवा विकी जैन यांनी आपल्‍या रिलेशनशीपबद्‍दल उघडपणे सांगितलेले नाही.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like