‘बिग बॉस 14’मध्ये झळकणार अंकिता लोखंडे ?

बिग बॉसच्या 14व्या सीजनचे लवकरच आगमन होणार असून नुकताच टीजर रिलीज करण्यात आला आहे. त्यातच या शोचे नाव बदलून बिग बॉस 2020 असे करण्यात आले आहे. दरम्यान, या शोमध्ये कोणकोणते कंटेस्टेंट असणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची एक्‍स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे या शोमध्ये सहभागी होण्याची चर्चा आहे. त्यातच बिग बॉसचे मेकर्स लवकरच अंकिता लोखंडेला अप्रोच करण्यासाठी प्लॅनिंग करत आहेत.

अंकिता लोखंडेची खास मैत्रिण रश्‍मी देसाई ही मागील शोमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी अंकिताने रश्‍मीला सपोर्ट करण्यासाठी पुढाकार घेतला होता. यामुळे आता अंकिता लोखंडे या शोची ऑफर स्वीकारणार की नाकारणार हे लवकरच समजेल.

 

You might also like