अनिकेत विश्वासरावच्या सासूचा डान्स व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होऊ लागेल याचा नेम नाही. आता अनिकेत विश्वासरावच्या सासूचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनिकेतची पत्नी स्नेहा हिने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
स्नेहाने तिच्या आईचा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘कोण म्हणेल की ही माझी आई आहे. माझ्यापेक्षा दहापटीने अधिक ऊर्जा आणि उत्साह तिच्यात आहे.’ ‘स्त्री’ चित्रपटातील ‘मिलेगी मिलेगी’ या गाण्यावर अनिकेची सासू डान्स करताना पाहायला मिळतेय. त्यांचा हा डान्स पाहून अनेकजण कौतुक करत आहेत.