वयाच्या 12व्या वर्षी ठेवले होते शरीरसंबंध; रणवीर सिंगचा खुलासा

वयाच्या बाराव्या वर्षी पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवल्याची कबुली अभिनेता रणवीर सिंगने दिली आहे. ‘डेक्कन क्रॉनिकल’ला दिलेल्या मुलाखतीत कंडोमच्या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारला असता त्याने हा खुलासा केला. १२ वर्षांचा असताना मी केवळ उत्सुकतेपोटी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या महिलेशी शरीरसंबंध ठेवले होते, असं तो म्हणाला.
दरम्यान ”मी प्रत्येक गोष्ट खूप कमी वयात केली. मी काळाच्या पुढे होतो असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. मी शाळेत असताना माझ्या मित्रांचे आईवडील मला म्हणायचे की, तू आमच्या मुलांना बिघडवत आहेस. माझ्या वयाच्या मुलांना सेक्सविषयी फार काही माहीत नव्हतं. त्यामुळे मी यात खूप एक्स्पर्ट झालो असं मला वाटायला लागलं होतं,” असं रणवीरने सांगितलं.