‘आनंदी गोपाळ’ चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित

भारतातील पहिल्या महिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीनवावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच ‘आनंदी गोपाळ’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

अत्यंत कठिण परिस्थितीचा सामना करत, समाजातील रूढी-परंपरा यांच्या विरोधात जाऊन आनंदी जोशी यांनी भारतातील पहिल्या महिल्या डॉक्टर होण्याचा मान मिळवला. ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटातून आनंदीबाई जोशी आणि गोपाळ जोशी यांच्या जीवनाची संघर्षमय गाथा या चित्रपटातून उलगडणार आहे.

झी स्टुडिओ प्रस्तुत ‘आनंदी गोपाळ’मध्ये अभिनेता ललित प्रभाकर गोपाळ जोशी यांची तर अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद आनंदीबाईंची भूमिका साकरणार आहेत. येत्या १५ फेब्रुवारी रोजी ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –