‘या’ मालिकेतून अमृता खानविलकरचा प्रवास संपला?

‘जिवलगा’ या मालिकेमध्ये स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे अशी तगडी स्टारकास्ट पाहाला मिळाली आता या मालिकेतील काव्या उर्फ अमृताचा मालिकेतील प्रवास संपला असल्याचे म्हटले जात आहे.
अमृताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमृताने जिवलगा मालिकेतील सर्व कलाकरांचे फोटो शेअर केले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत अमृताने सर्वांचे आभार मानले असून आता मी माझ्या पुढच्या प्रवासाठी मोकळी असे देखील तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
अमृताचा हा व्हिडीओ आणि कॅप्शन पाहता मालिकेतील अमृताच्या भूमिकेत आता दुसरी कोणती अभिनेत्री दिसणार? मालिकेतील काव्या या पात्राचा मालिकेतील प्रवास इथेच संपतो का? किंवा मालिका कोणते नवे वळ घेणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.