‘खतरों के खिलाडी’मध्ये जाणार अमृता खानविलकर?

‘खतरों के खिलाडी’ पर्व १० लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या पर्वामध्ये अमृता खानविलकर सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.

या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा पु्न्हा दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या खांद्यावर आहे. तसेच शोचे चित्रीकरण ऑगस्ट महिन्यात सुरु होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अमृताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने चाहत्यांना ‘खतरों के खिलाडी पर्व १०’मध्ये सहभागी व्हावे की नाही असा प्रश्न विचारला आहे.  तिच्या या पोस्टमुळे चर्चांना आणखी दुजोरा मिळाला आहे.

 

You might also like