अमित्रियान पाटीलचा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित

आमित्रियान पाटीलने अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली आहे. अमित्रियानचा बॉईज 2 हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला. आता त्याचे दोन मराठी व दोन हिंदी चित्रपट येणार आहे. त्यात आसूड – The whip against system ह्या धडाकेबाज फिल्म चा समावेश असून चित्रपट 8 फेब्रवारीला प्रदर्शित होणार आहे.

या भूमिकेबाबत अमित्रियान सांगतो, ज्यापण भूमिका मी आजपर्यंत केल्या त्या एकसारख्या नव्हत्या. एकसारखा अभिनय करून पुढे जाणे सोपे असते. मात्र तसे न करता निवडक व आव्हानात्मक भूमिका साकारणे आवडते.’ मित्राकडे व्हिसीआर होता. सर्व मिळून पैसे गोळा करून चित्रपट बघायचो. या व्हिसीआरने जीवनाच्या रंगभूमिवरील खर्‍या सिनेमाचा मार्ग दाखविला. लहानपणापासून जे जगलो व जे आता अनुभवतोय त्यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे वेगळ्या प्रकारच्या भूमिका आणि वेगळे कथानक असलेले चित्रपट आज माझ्यासाठी प्रायोरिटी बनतात , असेही त्याने सांगितले.

महत्वाच्या बातम्या –