महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह? ट्वीट करून केला हा खुलासा

महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची बातमी काही वेळापूर्वी वेगाने पसरली होती.  मात्र त्यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे.सध्या अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयामध्ये आहेत. त्याचप्रमाणे त्यांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचं म्हटलं जात होतं.

मात्र हे वृत्त पूर्णपणे चुकीचं असल्याचं बिग बींनी स्पष्ट केलं आहे. एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ पोस्ट करत बिग बींनी ‘ती न्यूज फेक आहे, बनावट आहे’, असं ट्विटरवर स्पष्ट केलं. बिग बींचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ११ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

त्यांच्यापाठोपाठ अभिषेक बच्चनचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे या दोघांना ११ जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी पसरली होती. त्यावर बिग बींनी ट्विट केलं, ‘ती बातमी चुकीची, बेजबाबदार, फेक आणि खोटी आहे.’

अद्याप अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्या संबधितही कोणतीही माहिती समोर आली नाही आहे. याआधी अशी माहिती समोर आली होती की अमिताभ यांना आज डिस्चार्ज मिळणार अशी माहिती देखील समोर आली होती. मात्र त्याबाबतही अद्याप ठोस अशी माहिती मिळाली नाही आहे.

दरम्यान, अमिताभ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर देशभरातून त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात आली होती. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. त्यांच्यावर चाहत्यांचा प्रेमाचा, कौतुकाचा वर्षाव होतोच आहे. रुग्णालयातही ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. आपल्या आरोग्याबाबतची माहिती देत आहेत आणि विशेष म्हणजे आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचेही सातत्याने आभार मानत आहेत.

 

You might also like