तब्बल २५ वर्षांनी मराठी चित्रपटात करणार काम अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन तब्बल २५ वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत काम करणार आहेत. मिलिंद लेले दिग्दर्शित ‘ए बी आणि सी डी’ या मराठी चित्रपटात अमिताभ बच्चन महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे या चित्रपटात विक्रम गोखलेंसोबत त्यांची महत्वाची दृश्ये आहेत. या चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद हेमंत ऐदलाबादकर यांची आहे. येत्या २० मे पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. मुंबई आणि पुणे येथे या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण होईल.

You might also like