अमिताभ बच्चन यांनी दोन दिवसांपूर्वी कवितेतून सांगितल होतं, ‘वक्त ही तो है… गुजर जायेगा’!

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली झाली आहे. त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात खुद्द अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे तर त्यांच्या परिवारातील इतर सदस्यांची टेस्ट करण्यात येत असून त्यांचे रिपोर्ट येणे अजून बाकी असल्याची माहिती बच्चन यांनी दिली आहे. तर ‘माझ्या संपर्कात मागील 10 दिवसांत जे लोक आले आहेत त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी’ असे आवाहन अमिताभ यांनी केली आहे.

८ जुलैला अमिताभ बच्चन यांनी एक कविता आपल्या ट्विटरवर पोस्ट केली आहे. ‘गुजर जायेगा, गुजर जायेगा, मुश्किल बहुत है, मगर वक्त ही तो है. जिंदा रहने का ये जो जज्बा है, फिर उभर आएगा, गुजर जायेगा, गुजर जायेगा. माना मौत चेहरा बदल कर आयी है, माना रात काली है, भयावह है, गहराई है. लोग दरवाजों पे, रास्तों पे, रुके बैठे है, कई घबराये है, सहमे है, छिपे बैठे है. मगर यकीन रख, ये बस लम्हा है, दो पल है, दो पल में बिखर जायेगा. गुजर जायेगा, गुजर जायेगा, मुश्किल बहुत है, मगर वक्त ही तो है’. या कवितेतून अमिताभ बच्चन यांनी कोरोनाच्या कठीण काळात लढण्याची जिद्द दिली होती. आता याच जिद्दीने बच्चन पुन्हा बरे होऊन जोमाने काम करतील अशी पार्थना त्यांचे चाहते करत आहेत.

अभिनेता अभिषेक बच्चनलाही करोनाची लागण झाली आहे. अभिषेकने  ट्विट करु करोनाची लागण झाल्याचं म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच महानायक अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्याचं त्यांनी स्वतः ट्विट करुन सांगितलं. त्यापाठोपाठ आता अभिषेक बच्चनचीही करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 

You might also like