आईच्या आठवणीत अमिताभ बच्चन झाले भावुक

स्वत:च्या सुखांचा त्याग करण्याचं धाडसं जर का कोणामध्ये असेल तर ते म्हणजे आई-वडीलांमध्ये. वडील मुलांचं छत्र होतात. तर आई मुलांचा आधार होते. आजच्या दिवसाचे औचित्य साधून अमिताभ बच्चन यांनी मदर्स डेच्या एक दिवस आधीच आपल्या आईप्रतीचं प्रेम व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.

अमिताभ बच्चन यांनी मदर्स डेचं निमित्त साधत ट्विटरवर एक गाणं शेअर केलं आहे. या गाण्यामधून ते आईच्या आठवणीमध्ये भावुक झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं. हे गाणं अमिताभ बच्चन, शुजित सरकार,अनुज गर्ग आणि त्यांच्या लहान मुलगा यांनी मिळून तयार केलं आहे. या गाण्यातून अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आईला तेजी बच्चन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

You might also like