अमिताभ बच्चन म्हणतात…. ‘या’ सहा लोकांपासून नेहमी दूर राहा

बिग बींना करोनाची लागण झाली असून मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात असले तरी ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. करोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली होती. बिग बींसोबतच अभिषेक बच्चनलाही करोनाची लागण झाली आहे. तर ऐश्वर्या राय बच्चन व आठ वर्षीय आराध्या यांना घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे
.महाराष्ट्रात कोरोना व्हायरसा विळखा अधिक घट्ट होताना दिसून येत आहे. त्यामुळे सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात येत असून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता महाराष्ट्रात गेल्या 24 तासात आणखी 8641 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 266 जणांचा बळी गेला आहे. तर राज्यात सध्या 1,14,648 अॅक्टिव्ह रुग्ण असून एकूण 11,194 जणांचा बळी गेला आहे. तसेच 1,58,140 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
महानायक अर्थात अमिताभ बच्चन चाहत्यांसाठी विविध पोस्ट लिहित असतात. त्यांनी नुकत्याच लिहिलेल्या एका पोस्टमधून चाहत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. आयुष्यात या सहा प्रकारच्या लोकांपासून कायम दूर राहा असं म्हणत त्यांना एक संस्कृत श्लोक लिहिला आहे.
संस्कृत श्लोकाचा अर्थ सांगत त्यांनी पुढे लिहिलं, ‘सर्वांची ईर्ष्या करणारे, घृणा करणारे, सतत नाखूश राहणारे, रागीट, सतत शंका घेणारे आणि इतरांवर अवलंबून असणारे… हे सहा प्रकारचे लोक नेहमी दु:खी असतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूरच राहिलं पाहिजे.’
बच्चन कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाल्यामुळे मुंबई महापालिकेने रविवारी ‘जलसा’, ‘प्रतीक्षा’, ‘जनक’ आणि ‘वत्सा’ हे त्यांचे चारही बंगले प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करून टाळेबंद केले. चारही बंगले र्निजतुक करण्यात आले असून पालिकेच्या वैद्यकीय पथकांनी चारही बंगल्यांतील सुमारे ३० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
केलेल्या पापांची फळे तर भोगावीच लागणार, ‘या’ अभिनेत्याने केले सलमान खानला ट्रोल!