नागपूरकरांचा निरोप घेताना भावूक झालेत अमिताभ बच्चन!

अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून झुंड चित्रपटाच्या शूटिंगसाठी नागपुरात होते. यादरम्यान अमिताभ यांनी नागपूरकरांचे प्रेम अनुभवले, तसाच नागपूरचा गारठाही अनुभवला. आपल्या सोशल अकाऊंटवर ‘झुंड’च्या सेटवरचे अनेक अपडेट्स अमिताभ यांनी शेअर केलेत. पण नागपूरकरांचा निरोप घेताना अमिताभ काहीसे भावूक झालेले दिसले. आपल्या सोशल अकाऊंटवर एक भावूक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अमिताभ यांचा हा चित्रपट फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे.नागराज यांचा बॉलिवूडचा पहिला हिंदी सिनेमा असणार आहे आणि या पहिल्या चित्रपटात महानायक अमिताभ दिसणार आहेत.

आता अमिताभ ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्टची जोडी यात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like