महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोनावर मात, पण…..

अमिताम बच्चन यांच्या चाहत्यासाठी खुशखबर आहे. कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आज त्यांना हाॅस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. खुद्द अमिताभ यांनी याबदल ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर मला रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. मी घरीच विलगीकरणात राहणार आहे. सर्वशक्तिमान देवाची कृपा. आई, बाबूजींचे आशीर्वाद, हितचिंतक आणि मित्रांचे आशीर्वाद आणि प्रार्थना तसेच नानावटी रुग्णालयात माझी उत्कृष्ट काळजी घेतल्यामुळे मला हा दिवस पाहणे शक्य झाले. ‘

अभिषेक बच्चन याने देखील ट्विट करत अमिताभ यांच्या डिस्चार्च बदल माहिती दिली आहे.

 

 

अभिषेकने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘माझ्या वडिलांची कोविड-19 चाचणी निगेटिव्ह आली आहे आणि त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आता ते घरी राहून आराम करतील. तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि शुभेच्छासाठी धन्यवाद.

 

अभिषेक पुढे म्हटले आहे की, त्याला अजूनही दवाखान्यातच रहावे लागेल. दुर्दैवाने काही कारणास्तव मी सध्या कोविड 19 पॉझिटिव्ह आहे आणि रूग्णालयात आहे. शुभेच्छा आणि प्रार्थना केल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार. मी लवकरच कोरोनावर मात करीन आणि निरोग होऊन परत येईन. मी तुम्हाला प्राॅमिस करतो.

 

 

You might also like