अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता!

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा १२ जुलै रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर पाच दिवसांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक ऐश्वर्याची मुलगी आराध्या या दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोघींची कोरोना टेस्टही पॉझिटिव्ह आली होती.

सध्या ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या प्रकृतीचे अपडेट्स चाहत्यांना मिळत आहेत. काल अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट करुन चाहत्यांचे आभार मानले होते. तर, आज नानावटी रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन व त्यांच्या मुलगा अभिषेक बच्चन या दोघांना आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी डिस्चार्ज मिळू शकतो असे वृत्त सूत्रांकडून मिळत आहे.

तसेच, अमिताभ बच्चन यांची आज संध्याकाळी कोरोना चाचणी केली जाणार आहे. अमिताभ यांच्यासह अभिषेक यांचीदेखील चाचणी केली जाणार आहे. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर कुठल्याही क्षणी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. अमिताभ यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांचं ऑक्सिजन लेव्हल आणि ब्लड प्रेशर सामान्य आहे, अशी माहिती नानावटी रुग्णालयाचे डॉक्टर अली इरानी यांनी दिली आहे.

दरम्यान, बिग बींना करोनाची लागण झाल्याचं समजताच कलाविश्वात आणि चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याविषयीची काळजी व्यक्त केली होती. तर अनेक मंदिरांमध्ये त्यांच्यासाठी खास पूजा, अभिषेकदेखील करण्यात आला होता.

You might also like