बिग बींचे ७५ टक्के लिव्हर खराब; अमिताभ बच्चन यांचा खुलासा

बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन सध्या आपल्या रिअलिटी गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’मुळे चर्चेत आहेत. परंतु, बिग बींना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे. अमिताभ बच्चन यांचे ७५ टक्के लिव्हर खराब झाले आहे. त्यांचे लिव्हर आता केवळ २५ टक्केच कार्यरत असल्याचा खुलासा स्वतः अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमात केले आहे.

अमिताभ बच्चन म्हणाले कि, प्रत्येकाला आपल्या शरीराची नियमित तपासणी करायला हवी. मला ट्यूबरक्लोसिसचा त्रास आहे. याशिवायही अनेक आरोग्याच्या समस्या आहेत. या आजारपणाचे वेळेत निदान झाले असते तर यावर उपचार संभव होते, असे त्यांनी सांगितले. ७६ वर्षीय अमिताभ लोकांमध्ये नेहमी टीबी, पोलिओ, हेपेटाइटिस्ट-बी, मधुमेह या आजारांविषयी जागरुकता निर्माण करत असतात.टीबी या आजाराची तपासणी करुन घ्यावी आणि त्यावर लवकरात लवकर औषधोपचार घेण्याचे आवाहन बिग बींनी लोकांना केले आहे.

अमिताभ बच्चन आपल्या फिटनेसची चांगली काळजी घेतात. सोबतच ते दिवसभर अॅक्टिव्ह राहतात. आणि खाण्या-पिण्यामध्ये सतर्क असतात. दरम्यान, त्यांचा ब्रम्हास्त्र चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गुलाबो सिताबो’ व ‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटाची शूटिंग सुरु आहे.