सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आलियाचा ‘हा’ फोटो !

आलिया भट्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.’गली बॉय’नंतर आलियाचा कलंक सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला. नुकताच आलियाने सिनेमाची शूटिंग पूर्ण केली. शूटिंग संपल्याचे फोटो आलिया आणि टिमने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आगामी ‘कलंक’ चित्रपटाच्या सेटवरील आलियाचा हा फोटो आहे. लाल रंगाच्या लहेग्यांत यात ती खूपच सुंदर दिसत आहे. दोन्ही हातात कलीरे बांधलेले असून पारंपरिक पद्धतीने लाल रंगाची ओढणी घेतली आहे. हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत असून यामुळे आलियाच्या लग्नाबद्दल ही चर्चा होत आहे. हा चित्रपट १९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.पण यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही.

सिनेमात आलियासोबत वरून धवन झळकणार आहे. त्याचबरोबर सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, माधुरी दीक्षित-नेने आणि आदित्य रॉय कपूर चित्रपटात झळकणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अभिषेक वर्मन यांनी केले. सिनेमाची निर्मिती करण जोहर, साजिद नाडियादवाला, हीरू यश जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केले आहे.

 

https://www.instagram.com/p/Bsx5sRoHYBp/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like