आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांच्यावर ‘गंगूबाई काठियावाडी’ साठी गुन्हा दाखल..

बॉलिवूड चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी आपल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. आता हा चित्रपट चित्रपट वादात अडकल्याचे वृत्त आहे.

वास्तविक, या चित्रपटाला आक्षेप घेत गंगूबाईच्या कुटुंबीयांनी बॉम्बे दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला आहे. या चित्रपटाच्या कथेबाबत गंगूबाईच्या कुटुंबियांना समस्या आहेत. तर त्यांनी भन्साळी, आलिया भट्ट आणि चित्रपटाची लेखिका हुसेन जैदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोर्टाने या तिन्ही सेलिब्रिटींना 7 जानेवारी 2021 पर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ दिला आहे. भन्साळीचा हा चित्रपट हुसेन जैदी लिखित ‘मुंबईच्या माफिया क्वीन’ पुस्तकावर आधारित आहे. गुजरातमधील काठियावाडी येथे राहणाऱ्या गंगा हरजीवनदास या मुलीचे संपूर्ण आयुष्य जैदीने या पुस्तकात रेखाटलेले आहे, ज्यात अनेक धक्कादायक खुलासे आहेत.

या चित्रपटाचे शूटिंग सध्या मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सुरु आहे आणि यापूर्वी बरेच शूटिंगही झाले आहे. गंगूबाईंचे खरे नाव गंगा हरजीवादास असून ती गुजरातमधील काठियावाडी येथील रहिवासी असते . वयाच्या 16 व्या वर्षी ति वडिलांच्या अकाउंटटच्या प्रेमात पडते आणि लग्नानंतर मुंबईत पळून जाते. असं म्हणतात की तिच्या नवऱ्याने तिला फक्त 500 रुपयात विकलं होत.

फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा या चित्रपटात दाखविली जाईल. आलिया पहिल्यांदाच या चित्रपटात गुंडगिरी करताना दिसणार आहे. त्याचवेळी आलिया आणि भन्साळी यांनी पहिल्यांदाच या चित्रपटासाठी हातमिळवणी केली. यात अजय देवगन एक कॅमिओ भूमिकेतही दिसणार आहे.

यापूर्वी हा चित्रपट यावर्षी 11 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोनाव्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही.

You might also like