नेटकऱ्यांच्या टीकेपासून वाचण्यासाठी आलिया भटने घेतला मोठा निर्णय

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. पण त्याच्या निधानानंतर सोशल मीडियावर घराणेशाही हा वाद पेटून उठला. त्यानंतर चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरसोबत अनेक स्टार किड्सवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला. अभिनेत्री आलिया भट्टला देखील मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले.

नुकतेच आलिया भटचा सडक 2 हॉटस्टारवर रिलीज होणार असल्याची नुकतीच घोषणा झाली आहे. ‘सडक 2’ ला ओटीटी प्लॉटफॉर्मवर रिलीज केले जाणार आहे. सिनेमाचे पोस्टर देखील रिलीज झाले आहे. पोस्टर रिलीज झाल्यानंतर सिनेमातील स्टारकाट्सला ट्रोल करण्याची सुरुवात झाली आहे. त्याचसोबत सिनेमाला #Boycott करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. आलियाला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे आलियाने सोशल मीडियावरील तिचे कमेंट सेक्शन बंद केले आहे. आलिया आधी बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी त्यांचे कमेंट सेक्शन बंद केले आहे.

‘सडक २’ या चित्रपटाच्या निमित्ताने महेश भट्ट तब्बल २० वर्षानंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरणार आहेत. तसेच या चित्रपटाची निर्मिती मुकेश भट्ट यांनी केली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया पहिल्यांदाच वडीलांसोबत काम करणार आहे. तर या चित्रपटात आलियाशिवाय आदित्य राय कपूर, संजय दत्त, पूजा भट असे अनेक कलाकार दमदार भूमिकेत दिसणार आहे.

 

You might also like