आलियाने पूर्ण केलं ७० किलो डेडलिफ्टचं आव्हान

सध्या फिटनेसचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. प्रत्येकाला आता फिट अँड फाइन राहावं असं वाटत आहे आणि ते साहजिकच आहे. आपलं आरोग्य आपणच चांगलं राखलं पाहिजे. ते आपल्याला हातात असतं आणि त्याकरिता व्यायाम करणं आवश्यक आहे.
अभिनेते-अभिनेत्रीसुद्धा सोशल मीडियाद्वारे फिटनेसचं महत्त्व वेळोवेळी अधोरेखित करत असतात. त्यातच अभिनेत्री आलिया भट्ट हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलिवूडमध्ये कमी वयात यशाची उंची गाठणारी अभिनेत्री म्हणून आलिया भट्टची ओळख आहे. नवनवीन भूमिकांचं आव्हान ती ज्याप्रकारे पेलते त्याचप्रकारे ती खऱ्याखुऱ्या आयुष्यातही नवीन आव्हानांना सामोरी जाते. डेडलिफ्टिंग करतानाचा तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल असून तिने यात ७० किलोचं वजन उचलल्याचं पाहायला मिळत आहे.
आलियाच्या फिटनेस प्रशिक्षकाने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट करत तिचं कौतुक केलं आहे. फिटनेसच्या बाबतीत तिने आतापर्यंत कशाप्रकारे प्रगती केली आहे हेसुद्धा त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे.