‘मी पण सचिन’ चित्रपटाचे ‘आयला आला रे सचिन’ हे गाणं प्रदर्शित

‘मी पण सचिन’ हा चित्रपट १ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्नील जोशी या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात स्वप्नील ‘सचिन पाटील’ नावाच्या एका ध्येयवादी माणसाची भूमिका साकारत आहे. अशा या चित्रपटातील ‘आयला आला रे सचिन ‘ हे गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

हा चित्रपट फक्त क्रिकेट वरच आधारित नाहीये. ह्या चित्रपटात क्रिकेट आणि आयुष्य यांना एकाच एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून दाखवल्या आहेत. असे मत स्वप्नील ने मांडले. ”

‘आयला आयला सचिन’ हे गाणं हर्षवर्धन वावरे, करण वावरे,आदित्य पाटेकर यांनी संगीतबद्ध केले असून आदित्य पाटेकर यांनी स्वरबद्ध केले आहे.

इरॉस इंटरनॅशनल आणि एव्हरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत आणि गणराज असोसिएट निर्मित ‘मी पण सचिन’ चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

You might also like