अक्षयचा २०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री करणारा पहिलाच चित्रपट

अक्षय कुमारचा ‘मिशन मंगल’ चित्रपट चार आठवड्यांनंतरही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसतोय. ‘मिशन मंगल’ने भारतात २००.१६ कोटींचा गल्ला जमवला आहे. यासोबतच २०० कोटी क्लबमध्ये एन्ट्री करणारा ‘मिशन मंगल’ अक्षय कुमारचा पहिलाच चित्रपट ठरला आहे. ‘मिशन मंगल’च्या जबरदस्त कमाईनंतर पुन्हा एकदा अक्षय कुमार बॉक्स ऑफिसचा ‘खिलाडी’ ठरलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. ‘मिशन मंगल’ १५ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड सलमानच्या ‘एक था टायगर’ चित्रपटाच्या नावे होता. सलमान-कतरिनाच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १९८.७८ कोटींची कमाई केली होती. पण ‘मिशन मंगल’ने सलमानच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडत २०० कोटींचा गल्ला पार केला आहे.
#MissionMangal crosses ₹ 200 cr… #AkshayKumar’s first double century… [Week 4] Fri 73 lakhs, Sat 1.40 cr, Sun 2.10 cr, Mon 61 lakhs, Tue 1.01 cr, Wed 54 lakhs, Thu 63 lakhs. Total: ₹ 200.16 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) September 13, 2019