अक्षय कुमारने लॉच केला एक नवीन गेम

भारतीय मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या “पब्जी’ गेमवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. या चीनी खेळाबद्‌दल मुलांमध्ये खूपच क्रेझ होती. याला आता अभिनेता अक्षय कुमार याने ब्रेक दिला आहे. अक्षय कुमारने आपल्या ट्‌विटर अकाउंटवर पब्जीच्या स्पर्धेत “फौजी’ अर्थात एफएयू-जी हा गेम लॉच केला आहे.

अक्षय कुमारची ही पोस्ट सध्या खूप व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या गेममधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग वीर जवानांच्या एका ट्रस्टला देण्यात येणार आहे.

अक्षय कुमारने आपल्या ट्‌वीटमध्ये म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “आत्मनिर्भर’ अभियानाचे समर्थन करत अ‍ॅक्‍शन गेम “फौजी’ लॉच करताना विशेष आनंद होत आहे. या खेळातून मनोरंजन होत असतानाच देशासाठी बलिदान देणा-यां जवानांचीही माहिती मिळणार आहे. या खेळातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या 20 टक्‍के रक्‍कम ही वीर ट्रस्टला डोनेट करण्यात येणार आहे.

दरम्यान, भारत-चीन सीमारेषावर तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारकडून अनेक चीनी मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात पब्जीसह 118 चीनी अ‍ॅप्सवर बॅन करण्यात आले आहे. केंद्राकडून यापूर्वीही अशीच कारवाई करत चीनी अ‍ॅप्सवर निर्बंध घालण्यात आले होते.

You might also like