अक्षय कुमारचा “लक्ष्मी बम’ चित्रपट पुन्हा चर्चेत

बॉलीवूडमधील “खिलाडी’ अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी यांचा मोस्ट अवेटेड “लक्ष्मी बम’ हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. ट्विटरवरही तो खूप ट्रेंड होत आहे. याचे कारण असे की, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याचा दावा करण्यात येत होता. पण आता हा चित्रपट सिनेमागृहातच प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे समजते.

या चित्रपटांच्या निर्मात्यांच्या मते हा चित्रपट फक्‍त ऑनलाइन प्रदर्शित न होता सिनेमागृहातही प्रदर्शित व्हायला हवा. यापूर्वी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार असल्याची चर्चा होत होती. याबाबत खुद्‌द कियारा आडवाणी आणि अक्षय कुमार यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट करून दिली होती.

अक्षय कुमाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत दोन गोष्टींची गॅरंटी दिली होती. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होती की, “लक्ष्मी बम’चा पहिला शो आपण घरात बसून पाहाल. दुसरी गॅरंटी – आपण हसालही आणि घाबरालही. दरम्यान, या चित्रपटाची अक्षय कुमारचे चाहते मोठया उत्सुकतेने वाट पाहत आहे. याशिवाय अक्षय कुमारने अन्यही चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत.

You might also like