अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

नुकताच ‘केसरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. परिणीती चोप्रा आणि अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.  या चित्रपटात अक्षय कुमार एका सैन्यदल अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

२१ भारतीय, शीख सैनिकांची शौर्यगाथा या ट्रेलर पाहायला मिळते आहे. जवळपस ३ मिनिटांचा हा ट्रेलर आहे. परिणीती चोप्राचा लूक आणि अक्षयने साकारलेला शीख सैनिक पाहताना अंगावर काटा येतो. अनुराग सिंग दिग्दर्शित या चित्रपटाच्या निमित्ताने एका वेगळ्या काळात डोकावण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.  हा चित्रपट २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like