अक्षय कुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचे ‘सानू कहेंदे’ गाणं प्रदर्शित

या वर्षामध्ये अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ३६ व्या शीख रेजिमेंटच्या २१ सैनिकांनी दहा हजार अफगाण सैनिकांना दिलेला लढा या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. काही दिवसं पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला त्या नंतर आता या चित्रपटातलं ‘सानू कहेंदे’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे.
या गाण्याला दमदार रोमी आणि ब्रिजेश शांडिल्य यांचा दमदार आवाज लाभला आहे. त्यामुळे हे गाणं ऐकताना आपोआप आपली पावले थिरकली जातात. दरम्यान, या गाण्याला तनिष्का बाग्चीने संगीत दिलं असून गणेश आचार्य यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. करण जोहर आणि अक्षय कुमार यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुराग सिंगने त्याच्या खांद्यावर घेतली आहे. हा चित्रपट २१ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –