अक्षयने दिला स्वच्छतेचा संदेश

अभिनेता अक्षय कुमार आगामी ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ या चित्रपटातून ‘स्वच्छ भारत अभियाना’चा संदेश देताना दिसणार आहे. अक्षय कुमार सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मध्यप्रदेशमधील होशंगाबादमध्ये आहे. अक्कीने होशंगाबादमध्ये पत्रकारासोबत बोलताना शौचालयाचा वापर करा, असा संदेश दिला.
यावेळी त्याने अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या आजारावर भाष्य केले. 1 हजार मुलांचा अतिसरामुळे मृत्यू झाल्याचा दाखला देत त्याने स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.
अक्षयने यावेळी सामाजिक जन जागृतीसाठी अनेक मोठे प्रोजेक्ट राबविण्यात येत असून ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले. अक्कीने यावेळी भोपाळ आणि होशंगाबाद शहरामधील स्वच्छतेचे कौतुक देखील केले. मुंबईपेक्षाही अधिक स्वच्छता याठिकाणी आहे, असे तो म्हणाला.
You might also like