जाणून घ्या अक्षयने अतरंगी रे चित्रपटासाठी किती मानधन घेतले

अक्षय कुमार आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. जो शूटिंगसाठी भरमसाट मानधन घेण्यासाठी ओळखला जातो. 2019 मध्ये एका पाठोपाठ एक हिट चित्रपट केल्यानंतर यावर्षी म्हणजेच २०२० मध्ये देखील त्याचे अनेक प्रोजेक्‍ट्‌स लाइन अप आहेत. “अतरंगी रे’मध्ये देखील अक्षय कुमार एकदा पुन्हा जबरदस्त अभिनय करताना दिसणार आहे.

यामध्ये अक्षय कुमार सोबत सारा अली खान आणि दाक्षिणात्य स्टार धनुष स्क्रीन शेअर करणार आहे. या दोघांसोबत अक्षय पहिल्यांदा काम करणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहेत.

दरम्यान, या चित्रपटाच्या 2 आठवड्यांच्या शेड्यूलसाठी अक्षय कुमारने आधीच्या मानधनापेक्षा जवळपास दुप्पट मानधन घेतले आहे.या चित्रपटामध्ये अक्षय कुमार एका स्पेशल भूमिकेत दिसणार असल्याची माहिती समोर येत आहे.

एका वृत्तानुसार अभिनेत्याने 2 आठवड्यांच्या शेड्यूलसाठी 27 कोटी रुपयांचे मानधन घेतले आहे. अक्षय कुमार 9 हा आकडा त्याचा लकी नंबर मानतो. त्यामुळे तो नेहमी मानधन घेताना 9 आकड्याशी जुळणाऱ्या संख्येचं तो मानधत घेतो.

 

You might also like