‘सुर्यवंशी’अक्षयसोबत सिंघम, सिम्बाही झळकणार

रोहित शेट्टीचा बहुचर्चित ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि रणवीर सिंहदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

अक्षय कुमारने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये  रणवीर सिंह, अजय देवगण, अक्षय कुमार, रोहित शेट्टी आणि करण जोहर झळकत आहेत. विशेष म्हणजे रणवीर आणि अजयदेखील सूर्यवंशीचा एक भाग होणार असल्याचा सूचक संदेश या फोटोमधून देण्यात आला आहे.

You might also like