८,५४८ रुपयांसाठी अक्षय कुमारने केला ‘हा’ स्टंट

अक्षय कुमार नेहमी वेगवेगळे स्टंट करताना दिसत असतो. अक्षय कुमारने कुटुंबीयांसोबत सुट्ट्यांचा आनंद लुटताना देखील एक स्टंट केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय एका दांडीला लटकलेला दिसत आहे. हा स्टंट करा आणि १०० पाऊंट्स (८,५४८ रुपये) घेऊन जा असे एक व्यक्ती व्हिडीओमध्ये बोलत असल्याचे दिसत आहे. ‘फोर्ब्स’च्या यादीत येऊनही आनंदी नसलेला अक्षय एका झटक्यात १०० पाऊंट्स कमावण्यासाठी हा स्टंट करत आहे असे तिने हा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे.

 

You might also like