अक्षय कुमारला भेटण्याची हौस चाहत्याला चांगलीच महागात पडली

अक्षय कुमारला भेटण्याची हौस एका चाहत्याला चांगलीच महागात पडली आहे. अंकित गोस्वामी असेअक्षय कुमारच्या चाहत्याचे नाव असून तो भुवनेश्वर येथे दुधाचा धंदा करायचा.

मात्र आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्याची इच्छा त्याला चांगलीच महागात पडली. अक्षयला भेटण्या साठीअंकित भुवनेश्वर येथून मुंबईत आला होता. गुगल मॅपवरून त्याने अक्षय कुमारच्या जुहू येथील बंगल्याचा पत्ता मिळवला आणि तिथे पोहोचला.

नंतर त्याने अक्षय कुमारला भेटण्यासाठी त्याच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. जुहू पोलिसांनी अंकितवर गुन्हा दाखल करून न्यायलयात हजर केलं असता न्यायलयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like