अक्षयला भेटण्यासाठी हरिद्वारहून सायकलने मुंबई गाठली

आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. ते कोणतीही सीमा ओलांडू शकतात,त्यातून त्यांचे निकळ प्रेमच दिसून येतं. एका चाहत्याने अक्षयच्या भेटीसाठी असे काही केले, की ज्यामुळे अक्षयही थक्क झाला. त्याने इन्स्टाग्रामवर यासंबंधी एक पोस्ट लिहीली आहे.
हरिद्वारमधील एक इसम अक्षयचा खूप मोठा फॅन असून त्याला भेटण्यासाठी त्याने थेट मुंबई गाठली आणि तीही सायकलवरून. एवढेच नव्हे तर तो अक्षयासाठी गंगाजलही घेऊन आला. त्यानंतर अक्षयने इन्स्टाग्रामवर त्या चाहत्यासोबतचा फोटो शेअर केला पण त्यासोबत एक मेसेजही. ‘ ही व्यक्ती हरिद्वारहून सायकलवरून मला भेटण्यासाठी आला, पण हे योग्य नाही. माझे तुम्हा सर्वांवर प्रेम आहे, पण कृपया कोणीही असे काही (कृत्य) करू नका.’
अक्षय लवकरच ‘जॉली.एल.एल.बी-२’ हा चित्रपट चाहत्यांसाठी घेून येत असून त्यामध्ये हुमा कुरेशीही प्रमुख भूमिेकत झळकणार आहे.
You might also like