‘या’ चित्रपटासाठी अक्षय कुमारने मोडला १८ वर्षांचा नियम

बॉलिवूडच्या झगमगाटात वावरताना अक्षय कुमारने काही नियम आखले असून त्याचं कडक पालन करत असतो. मात्र नुकतंच अक्षय कुमारने ‘बेल बॉटम’ चित्रपटासाठी गेल्या १८ वर्षांपासून आखून ठेवलेला एक नियम मोडला आहे. या चित्रपटाचं सध्या स्कॉटलंडमध्ये चित्रीकरण सुरु आहे.

स्कॉटलंडमध्ये पोहोचल्यानंतर १४ दिवस क्वारंटाइन राहावं लागल्याने निर्मात्यांच्या नुकसानाची कल्पना असल्याने अक्षय कुमारने मदतीसाठी धाव घेतली. यावेळी त्याने आपल्या १८ वर्षांचा नियम मोडला. गेल्या १८ वर्षांपासून अक्षय कुमारने दिवसातून आठ तास काम करण्याचा नियम केला आहे. पण ‘बेल बॉटम’ चित्रपटाच्या निर्मात्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अक्षय कुमारने डबल शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाचं लवकरात लवकर शुटिंग संपवण्याचा अक्षय कुमारचा प्रयत्न आहे.

रंजित तिवारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. हा चित्रपट २ एप्रिल २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

You might also like