‘दे दे प्यार दे’चित्रपटासाठी अजयच्या चाहत्यांना करावी लागणार प्रतीक्षा!!

अजय देवगणच्या आगामी चित्रपट ‘दे दे प्यार दे’बद्दल एक ताजी बातमी आहे. ‘दे दे प्यार दे’ हा चित्रपट एक रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट आहे. ‘दे दे प्यार दे’ची रिलीज डेट लांबणीवर असल्याचे कळतयं. आधी हा चित्रपट येत्या १५ मार्चला रिलीज होणार होता. पण आता हा चित्रपट यावर्षी १७ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समजते आहे. ‘दे दे प्यार दे’च्या मेकर्सने खुद्द ही माहिती दिली आहे.
अजय देवगणचा ‘दे दे प्यार दे’ आणि ‘टोटल धमाल’ हे दोन्ही चित्रपट आपआपसात क्लॅश होत होते. एकाच स्टारचे दोन चित्रपट केवळ २०दिवसांच्या फरकाने रिलीज होणे, हे कमाईच्या दृष्टीने योग्य नव्हते. यामुळे मार्केटींग कॅम्पेनमध्ये अडचणी उद्भवल्या असत्या. ‘दे दे प्यार दे’ एक बिग बजेट चित्रपट आहे. त्यामुळे आम्ही या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर टाकणेचं योग्य समजले, असे चित्रपटाचा निर्माता भूषण कुमार याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
- सई ताम्हणकरने शेअर केल्या ‘पाँडेचरी’ मधील काही खास गोष्टी
- दिलीप कुमार व सायरा बानो यांची नात सायशा सहगल अडकणार विवाहबंधनात
- सतिश कौशिक येत्या महिला दिनी महिलांना देणार खास गिफ्ट
- ‘मी खरंच हरामी असेन तर लोकांना सत्य काय ते कळू दे’