खलनायकाच्या भूमिकेत दिसणार अजय देवगण

बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता अजय देवगण याने आतापर्यंत बॉक्‍स ऑफिसवर अनेक हिट चित्रपट दिले असून या चित्रपटांमध्ये त्याने खलनायकांना धुळ चारल्याचे दिसून आले आहे.

मात्र आता अजय टेबल टर्न करणार आहे. तो आता हीरोच्या समोर व्हिलनगिरी करणार आहे. याबाबत अजय देवगण याचे एका मोठ्या प्रोडक्‍शन हाऊससोबत चर्चा सुरू असल्याचे समजते. हा एक बिग बजेट चित्रपट असणार आहे. यात एक नामी स्टार सुपरहीरोची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटात सुपरहीरोच्या समोर व्हिलनचीही भूमिका दमदार असल्याने अजय देवगणला ऑफर देण्यात आली आहे. हा चित्रपट अजय देवगण याने साइन केला आहे. यात खलनायकाची भूमिका निर्णायक असल्याने अजयने त्याला होकार दर्शविला आहे.

त्याची भूमिका ही नायकापेक्षाही महत्त्वाची असल्याने तो यासाठी तयार झाला आहे. या चित्रपटाची पुढील काही दिवसांत अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या प्रोडक्‍शन हाउससोबत अजय देवगण पहिल्यांदाच काम करत आहे.

You might also like