‘तानाजी’मध्ये आणखी एका मराठी अभिनेत्याची वर्णी

संजय जाधव यांचा ‘लकी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. या चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटामधील खलनायकाच्या भूमिकेचीही मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. या खलनायकाची भूमिका धैर्यशील याने साकारली होती.

धैर्यशील आता लवकरच अभिनेता अजय देवगणच्या ‘तानाजी’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तानाजींच्या पराक्रमाची कथा लवकरच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण तानाजी ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. त्याच्यासोबतच बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार मंडळीही यात झळकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.